Nashik News:...अन् दुकानावर नायलॉन मांजा बंदीचे फलक झळकले! विक्रेत्यांवर तिसरा डोळा

A placard displayed at a kite shop regarding the ban on the sale of nylon manja.
A placard displayed at a kite shop regarding the ban on the sale of nylon manja.esakal

जुने नाशिक : नायलॉन मांजा विक्रीविरुद्ध पोलिस विभाग ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शहराच्या विविध भागात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत लाखोचा मांजा जप्त करण्यात आला. त्यामुळे पतंग विक्री दुकानांवर नायलॉन मांजा बंदी असल्याचे फलक झळकल्याचे दिसून येत आहे. (nylon manja ban board appeared on shop third eye on sellers Nashik News)

काही दिवसांवर संक्रांत येऊन ठेपली आहे. पतंग प्रेमींमधील उत्साह वाढला आहे. ठिकठिकाणी पतंग बाजीचे पेज लढताना दिसत आहे. पतंग आणि मांजा खरेदीसाठी दुकानांवर गर्दी होत आहे. एकूणच पतंग मांजाचे बाजारपेठ तेजीत आले आहे. तर दुसरीकडे नायलॉन मांजामुळे नागरिक आणि पक्षी जखमी होण्याच्या घटना घडत आहे. अशा घटनांना आळा बसावा. यासाठी पोलिस विभागाकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर फास आवळण्यास सुरवात केली आहे.

पोलिस आयुक्तांनी कडक आदेश दिल्याने शहरातील प्रत्येक पोलिस ठाणे आणि विशेष पथक नायलॉन मांजा विक्रीविरुद्ध कारवाईस लागले आहे. जुने नाशिक, सिडको, पंचवटी, अंबड अशा विविध ठिकाणी कारवाई करत लाखोंचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे मांजा विक्रेत्यांना काहीशी धडकी भरली आहे. त्यांच्याकडून मांजा विक्रीसाठी विविध उपाय योजना केल्या जात आहे. काही दुकानदारांकडून नायलॉन मांजा विक्रीस बंदी असल्याचे फलक दुकानाच्या दर्शनी भागास लावण्यास सुरवात केली आहे.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

A placard displayed at a kite shop regarding the ban on the sale of nylon manja.
Gram Panchayat Election : 75 वर्षांच्या आजी बनल्या वडगाव पिंगळाच्या सरपंच!

अनेक दुकानांवर अशा आशयाचे फलक झळकले देखील आहे. नायलॉन मांजा येथे विक्री होत नाही. कुणीही संपर्क करू नये. अशा प्रकारचा मांजा विक्रीस कायदेशीर बंदी आहे. मागणी केल्यास पोलिसांना कळवले जाईल. अशा विविध प्रकारच्या सूचना फलकाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहे. असे असले तरी देखील अनेक दुकानदार चोरीछुपे मार्गे मांजा विक्री करत आहे.

सोशल मीडियाचा वापर

वस्तू खरेदी विक्रीत सध्या सोशल मीडियाचा चांगलंच धबधबा आहे. विविध प्रकारचे कोडवर्ड तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नायलॉन मांजा विक्री केला जात आहे. त्याचप्रमाणे ऑन कॉल वरून देखील मांजा विक्री होत आहे. फोनवर मांजा विक्रीचे ठिकाण निश्चित करून त्याठिकाणी ऑर्डर प्रमाणे मांजा पोहोचविला जात आहे.

A placard displayed at a kite shop regarding the ban on the sale of nylon manja.
Nashik Crime News: नायलॉन मांजा प्रकरणी शहर पोलिस आक्रमक! साठा करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com