Illegal Nylon Manja Sale
sakal
नाशिक: राज्यभर बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे पुन्हा एकदा निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. एकीकडे पोलिस व पालिकांची कारवाई सुरू असताना दुसरीकडे नाशिक, सिन्नर व निफाड परिसरात नायलॉन मांजाची बिनधास्त विक्री आणि वापर सुरूच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. काही तासांच्या अंतराने घडलेल्या घटनांनी प्रशासनाच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.