Nylon Manja
sakal
जुने नाशिक: गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पक्ष्यांना नायलॉन मांजाचा फास लागण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२५ संपूर्ण वर्षात ३७ पक्ष्यांना मांजाचा फास बसून ५ पक्षांचा मृत्यू झाला. तर चालू वर्षात केवळ २० दिवसात ३९ पक्षांना खास बसून ६ पक्षांचा मृत्यू झाला आहे. तर ३३ पक्ष्यांचा प्राण वाचवण्यात अग्निशामक विभागाला यश आले आहे.