
OBC आरक्षणावर शिक्कामोर्तब; नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत
नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर (OBC Reservation) शिक्कामोर्तब केल्यानुसार शुक्रवारी (ता. २९) महापालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची प्रक्रिया पार पडली. अनुसूचित जाती, जमाती प्रवर्ग वगळता १०४ जागांपाकी ओबीसींसाठी ३५, महिलांसाठी ३४ जागांवर आरक्षण काढण्यात आले. जवळपास दहा ते बारा प्रभागांमध्ये दोन महिला आरक्षण आल्याने दिग्गज नगरसेवकांची कोंडी झाली. प्रथम एकही महिला आरक्षण नसलेल्या बारा प्रभागांत थेट आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यानंतर किमान दोन जागा अराखीव असलेल्या प्रभागातील एक जागा सर्वसाधारण महिलांसाठी १३ जागांवर आरक्षण काढण्यात आले. (Latest Marathi News)
हेही वाचा: मराठा समाजाला पुन्हा धक्का; EWS आरक्षणाचा लाभ देण्यासंदर्भातील जीआरही रद्द
महाकवी कालिदास कलामंदिरात आरक्षण काढण्यात आले. महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण कार्यक्रम पार पडला. २०११ च्या जनगणनेला अनुसरून त्यात दोन ते अडीच टक्के लोकसंख्या वाढल्याच्या अंदाजाने ४४ प्रभागांची निश्चिती करण्यात आली. तीन सदस्यांचे ४३, तर चार सदस्यांच्या एका प्रभागात एकूण १३३ नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात आली होती. यात यापूर्वी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १९, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दहा जागांसाठी आरक्षण काढण्यात आले होते. त्यामुळे उर्वरित १०४ जागांमधून आरक्षण काढले गेले. यातही नागरिकांचा मागास प्रवर्गात ३५ जागा, तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी ३४ जागांसाठी आरक्षण काढण्यात आले.
हेही वाचा: वृद्धांसाठी आनंदाची बातमी ! मिळणार ३६ हजार रुपये पेन्शन
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आणि त्यानंतर सर्वसाधारण गटाचे महिला आरक्षण निश्चित करण्यात आले. ओबीसींच्या ३५ जागांपैकी २१ जागांवर थेट आरक्षण देण्यात आले. उर्वरित १४ जागांसाठी सोडत काढण्यात आली. एका प्रभागात दोन अराखीव असलेल्या १९ प्रभागांमध्ये १४ जागांसाठी सोडतीद्वारे आरक्षण काढण्यात आले. ओबीसींच्या राखीव ३५ जागांपैकी १८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक आठ चार सदस्यांचा असल्याने ८ अ जागेवर थेट ओबीसी महिला आरक्षण देण्यात आले. सर्वसाधारण प्रवर्गाच्या ६९ जागांमधून ३४ महिला आरक्षण काढण्यात आले.
हेही वाचा: मुंबई : आरक्षण सोडत प्रक्रियेवर भाजप, कॉंग्रेसचा आक्षेप
- एकूण मतदारसंख्या : १४,८६,०५३
- अनुसूचित जाती मतदारसंख्या : २,१४,६२०
- अनुसूचित जमाती मतदारसंख्या : १०,७,४५६
- एकूण प्रभाग ः ४४
- तीन सदस्यांचे ४३ प्रभाग.
- चार सदस्यांचा प्रभाग क्रमांक आठ.
- एकूण नगरसेवकसंख्या ः १३३
आरक्षित जागांची स्थिती खालीलप्रमाणे
प्रवर्ग एकूण जागांची संख्या महिलांकरिता आरक्षित जागा
अनुसूचित जाती १९ १०
अनुसूचित जमाती १० ०५
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ३५ १८
सर्वसाधारण ६९ ३४
---------------
-एकूण १३३ ६७
हेही वाचा: ४३ वर्षीय विवाहितेचा छळ! माहेरून पैसे आण, नाहीतर खुलानामा दे म्हणून दमदाटी
Web Title: Obc Reservation In Nashik Municipal Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..