नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्य सीमांकनाचा अडथळा लवकरच दूर

Bird Sanctuary of Nandurmadhyameshwar Nashik Marathi News
Bird Sanctuary of Nandurmadhyameshwar Nashik Marathi Newsesakal

नाशिक : ‘रामसर’चा दर्जा प्राप्त झालेल्या राज्यातील पहिल्या नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्याचा (Bird Sanctuary) अनेक वर्षांपासून रखडलेला सीमांकनाचा अडथळा आता लवकरच दूर होणार आहे.

या संदर्भात वन्यजीव, महसूल आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेतून सकारात्मक निर्णय झाला आहे. आवश्‍यक ती सर्व प्रक्रिया करण्यासाठी सकारात्मक चर्चा करत मदत करण्याचे ठरविण्यात आल्याने काही दिवसांमध्ये पक्षी अभयारण्याचा रखडलेला सीमांकनाचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. (Obstacle to demarcation of bird sanctuary at Nandurmadhyameshwar soon removed Nashik Latest Marathi News)

महाराष्ट्राचे ‘भरतपूर’ समजल्या जाणाऱ्या आणि राज्यातील पहिले व भारतातले ३१ रामसर स्थळ दर्जा प्राप्त पक्षी अभयारण्य आहे. निफाड तालुक्यातील चापडगाव शिवारात असलेल्या नांदूरमध्यमेश्‍वर बंधाऱ्यामुळ त्याच्या बॅकवॉटरचा परिसर दलदलीचा बनला.

यातच नदीच्या प्रवाहातील गाळ साचल्याने उंचवटे तयार झाले. उथळ पाणी, विपुल जलचर, विविध पाणवनस्पती, वृक्षराई आणि शेजारील सिंचनशेतीतील पिके यामुळे पक्ष्यांच्या निवासाकरिता परिसर उपयुक्त ठरला.

हळूहळू २६५ पेक्षा जास्त पक्षी, २४ जातीचे मासे, ४०० पेक्षा जास्त वनस्पतींची नैसर्गिक संपत्ती येथे निर्माण झाली. यामुळे १९८६ मध्ये १००.१२ चौरस किलोमीटर क्षेत्रात अभयारण्य घोषित झाले. मात्र या अभयारण्याची सीमांकन निश्‍चिती झाली नव्हती.

Bird Sanctuary of Nandurmadhyameshwar Nashik Marathi News
प्रशासनाच्या चुकीमुळे NAMCO बँकेला भुर्दंड : अध्यक्ष हेमंत धात्रक

येथील सुपीक जमिनीमुळे व अभयारण्याचे क्षेत्र निश्‍चित नसल्याने शेतजमिनी, गाळपेरा, जलप्रदूषण, पाणीउपसा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने आणि वेळोवेळी गरजेनुसार येथील जमिनीवर अतिक्रमण होऊ लागले.

वाढत्या अतिक्रमणामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण झाला. भविष्यात येथील जैवविविधता वाचविण्याच्या दृष्टीने वन्यजीव विभागाने ठोस पावले उचलत अभयारण्याची सीमा ठरविण्यासाठी आवश्‍यक ती सर्व प्रक्रिया केला.

बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या अभ्यासकांनी सीमांकनाचा अहवाल शासनाकडे पाठविला आला. यामध्ये एक हजार १६३ हेक्टर क्षेत्र पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्याची पडताळणी करणे आणि त्यासंदर्भातील कागदपत्रांसाठी व त्यांच्या जमिनीचे मोजमाप करत त्याचे सीमांकन अंतिम करण्याच्या उद्देशाने वन्यजीव विभागाकडून पाटबंधारे विभागाकडे सतत पाठपुरावा करण्यात आला.

मात्र, पाटबंधारे याबाबत ठोस निर्णय घेतला जात नसल्याने पक्षी अभयारण्याच्या सीमांकनाच्या प्रस्तावाचे घोंगडे भिजतच पडले होते.

Bird Sanctuary of Nandurmadhyameshwar Nashik Marathi News
प्रशासनाच्या चुकीमुळे NAMCO बँकेला भुर्दंड : अध्यक्ष हेमंत धात्रक

कागदपत्रे देण्यास सहमती

पक्षी अभयारण्याच्या सीमांकनाबाबत पाटबंधारे विभागाकडून एक हजार १६३ क्षेत्राची पडताळणी करून पाटबंधारे व वन्यजीव विभागांचे क्षेत्र अंतिम करण्याच्या उद्देशाने प्रक्रिया सुरू झाली आहे. यासंदर्भात वन्यजीव, पाटबंधारे आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चादेखील झाली असून, जमिनीची कागदपत्रे ही पाटबंधारे विभागाकडून महसूल खात्यास पडताळणीसाठी वर्ग केली जाणार आहे.

त्यानंतर तिन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांकडून आता जमिनीची पाहणी करून जागेवरच निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. यामुळे अभयारण्याच्या सीमांकनाचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. त्यामुळे येथील गाळपेरा आणि असुरक्षितता रोखणे वन्यजीव विभागाला शक्य होणार आहे.

तसेच भविष्यात पाटबंधारे विभागास बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यासदेखील काही जमीन उपलब्ध होणार आहे. पाटबंधारे विभागाकडून कागदपत्रे महसूल विभागास दिले जाणार आहे. त्यानंतर महसूल विभागाकडून अंतिम अधिसूचना निघेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com