इंस्टाग्रामवर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्य विधान केल्याने तणाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भद्रकाली पोलिस ठाण्यात जमा झालेले मुस्लिम बांधव.

इंस्टाग्रामवर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्य विधान केल्याने तणाव

जुने नाशिक - हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत इंस्टाग्रामवर अज्ञात संशयिताकडून आक्षेपार्ह विधान करण्यात आले. मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याने शेकडोच्या संख्येने मुस्लिम बांधव भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल झाले. संशयितावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत संशयितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निर्वंळला.

इंस्टाग्रामवर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्य विधान केल्याचे वृत्त शुक्रवार(ता.१०) रात्री बारा वाजेच्या सुमारास पसरताच जुने नाशिक, वडाळा रोड तसेच वडाळा गाव परिसरातील मुस्लिम बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने शेकडॉच्या संख्येने मुस्लिम बांधव भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलीस ठाणे ते मौला बाबा दर्गा चौकपर्यंत केवळ मुस्लिम बांधवांचा जमाव दिसून येत होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी करत संशयितावर गुन्हा दाखल करत कडक कारवाई करण्याची मागणी केली. पोलिस अधिकाऱ्यांकडून त्यांची समजूत काढण्यात आली. संशयितांविरुद्ध तक्रार दाखल करून घेत त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले. शिवाय सायबर क्राईम विभागास देखील त्वरित कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

वडाळा रोड, भारत नगर परिसरातील मुस्लिम बांधवांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल होत कारवाईची मागणी केली. इंस्टाग्राम आय डी चा उल्लेख असलेला कारवाईसाठीच तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात दाखल केला. त्याचप्रमाणे वडाळा गावातील बांधवांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात दाखल होत कारवाईची मागणी केली. घडलेल्या घटनेमुळे जुने नाशिक परिसरासह मुस्लिम बहुल भागात तणावाचे वातावरण पसरले होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी सर्वत्र अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

आयडी पोलीसांकडे सुपूर्द

इंस्टाग्रामच्या ज्या आयडीवरून आक्षेपार्ह विधान करण्यात आले आहे. मुस्लिम बांधवांकडून तो आयडी पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. abhishek-singh-8797 असा आय डी आहे. पोलिसांनी तो आयडी सायबर क्राईम विभागाकडे देण्यात आला आहे.

Web Title: Offensive Statement About Hazrat Mohammad Prophet On Instagram

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top