टेबलावर दिसताय अधिकारी-कर्मचारी; कारवाईच्या बडग्यामुळे कामांचा निपटारा

public in government office
public in government officeesakal

जुने नाशिक : महापालिका आयुक्तांनी (NMC Commissioner) कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेळेची शिस्त लावण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. लेटलतिफ कर्मचाऱ्यांसह जेवणाच्या सुटीत अधिक उशीर करणाऱ्यांवर कारवाईचा (action) बडगा उगारला आहे. सर्व विभागीय कार्यालयांना अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी बनवून मुख्यालयात पाठविण्याच्या सूचना केली आहे. त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले असून, बराच वेळ रिकाम्या असणाऱ्या टेबल-खुर्च्यांवर अधिकारी-कर्मचारी विराजमान झालेले दिसून येत आहेत. (Officers staff on work due to discipline of NMC Commissioner Nashik News)

अधिकारी व कर्मचारी वेळेवर येत नाही. दुपारी जेवणाच्या सुटीदरम्यान शासकीय नियमानुसार असलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ जेवणाची सुटी घेतात. त्यामुळे कामात दिरंगाई होत असते. अशा विविध तक्रारी मुख्यालयास प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून कार्यालयासह अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन घालत शिस्त लावण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून लेटलतिफांवर धडक कारवाई सुरू केली आहे. दुपारी जेवणासाठी अर्धा तासाची वेळ निश्चित केली आहे. अर्धा तासात जेवण करून प्रत्येकाने आपापली कामे सांभाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालन न करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची नावांची यादी तयार करून मुख्यालयास सादर करण्याच्या सूचना विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

public in government office
ग्राहक प्रबोधन केंद्र ही अभिमानाची बाब; छगन भुजबळ

आयुक्तांच्या या आदेशामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहेत. विभागीय कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी वेळेत हजर राहून कामांना प्राधान्य देत आहे. जेवणाच्या अर्ध्या तासाच्या सुटीतच जेवण करून पुन्हा आपल्या जागेवर येऊन कामे करीत असल्याने नागरिकांच्या कामांसह कार्यालयीन कामात वेग आला आहे. वेळेवर कामे होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कामाचा निपटाराही अधिक होत असल्याचे काही दिवसात दिसून आले आहे.

public in government office
Nashik : उष्णतेमुळे कांदा सडतोय अन्‌ शेतकरी रडतोय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com