जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑफलाइन अर्जही स्विकारणार | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जात प्रमाणपत्र पडताळणी

नाशिक : जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑफलाइन अर्जही स्विकारणार

नाशिक : विविध शिक्षणक्रमांच्‍या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जात वैधता प्रमाणपत्र, प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्‍याची पावती जोडणे गरजेचे आहे. त्‍यामूळे प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, ऑनलाइन प्रणाली मंदावली आहे. त्‍यामूळे आता ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज स्‍वीकारले जाणार आहेत. त्‍यासाठी २५ नोव्‍हेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्‍था (बार्टी), पुणे यांनी यासंदर्भात बुधवारी परीपत्रक काढले आहे. त्यात म्‍हटले आहे, की विविध जिल्ह्यांतून अर्जदार, लोकप्रतिनिधी, तसेच समिती कार्यालयाकडून याबाबत ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्‍वीकृती करण्याबाबत विनंती केली आहे. सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरु असून, त्‍याकरीता उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची, प्रस्‍ताव दाखल केल्‍याच्या पावतीची आवश्‍यकता आहे. अर्जदारांची गैरसोय टाळण्यासाठी येत्‍या २५ नोव्‍हेंबरपर्यंत अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ऑफलाईन अर्ज फक्‍त शैक्षणिक कारणाकरीता स्‍वीकारले जातील. अर्जदारांची संख्या विचारात घेता, आवश्‍यकतेनुसार अर्ज स्‍वीकारण्याचा टेबल, खिडकी वाढविण्यात यावी. ऑफलाईन स्‍वरुपात अर्ज स्‍वीकारलेल्‍या अर्जदारांची माहिती विभागाला पाठविण्याच्‍या सूचना केल्‍या आहेत.

विद्यार्थ्यांच्‍या वाढत्‍या तक्रारी लक्षात घेता, जिल्‍हास्‍तरीय समिती पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. ऑनलाइन प्रमाणे ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्‍वीकारण्यास परवानगी देण्याची मागणी केली. या पाठपुराव्‍याला यश आले आहे.

-ॲड. अजिंक्‍य गिते, सामाजिक कार्यकर्ते

loading image
go to top