Nashik : बिटकोचे १५ दिवसात स्थलांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Bytco Hospital

Nashik : बिटकोचे १५ दिवसात स्थलांतर

नाशिक : नाशिक रोडच्या जुन्या बिटको रुग्णालयाचे (bytco hospital) येत्या १५ दिवसात नवीन इमारतीत स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh pawar) यांनी दिली. काही दिवसांपूर्वी आयुक्त पवार यांनी जुने व नविन बिटको रुग्णालयाची पाहणी केली होती. आउटसोर्सिंग माध्यमातून लवकरच रेडिओलॉजिस्ट (Radiologist) पद भरले जाणार असून, इतर मशिनरी सुरू केल्या जाणार आहेत. (old Bytco Hospital Nashikroad will shift in 15 days to new building Nashik news)

सध्या जुन्या बिटको रुग्णालयात ओपीडीसह (OPD) विविध शस्रक्रिया, प्रसूती आदींसह विविध उपचार केले जातात. सिन्नर फाटा, चेहेडी, एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, शिंदे, पळसे, देवळाली गाव, विहीतगाव, उपनगर, जेल रोड आदी परिसरातील रुग्ण येत असतात. जुन्या रुग्णालयावर येणारा ताण पाहता यास पर्याय म्हणून महापालिकेने बाजूलाच असलेल्या आपल्या जागेवर मोठी इमारत बांधली. परंतु, कोरोनामुळे रुग्णालयात स्थलांतर होऊ शकले नाही. त्यातच दोन वर्षापूर्वी कोरोना सारखे संकट आले. या वेळी नव्याने बांधलेल्या बिटको रुग्णालयाचा मोठा आधार महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला झाला.

हेही वाचा: Chalisagaon : जुगार अड्ड्यावर छापा; 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कोरोना रुग्णांची सोय याच नवीन रुग्णालयात करण्यात आली. कोरोनामध्ये जुन्या रुग्णालयात जागा नसल्याने या रुग्णांची व्यवस्था नवीन रुग्णालयात करण्यात आली. पाहता, पाहता रुग्णांची संख्या एवढी वाढली की, साडेसातशेहून अधिक संख्येच्या पुढे आकडा गेला होता. त्या वेळी नवीन बिटको रुग्णालयाची मोठी मदत झाली. हे रुग्णालय नसते तर आरोग्य यंत्रणा पेचात पडली असती. दरम्यान, कोरोना प्रादुर्भाव सध्या संपल्यात जमा आहे. त्यामुळे जुन्या बिटको रुग्णालयाचे स्थलांतर आता नवीन बिटको रुग्णालयात करण्याची मागणी होऊ लागली आहे.

हेही वाचा: Nashik : PUBG खेळण्याच्या नादात थेट नांदेड ते नाशिक प्रवास

रुग्णांच्या सोयीचे
महापालिका आयुक्तांनी बिटको रुग्णालयाचा दौरा केल्यानंतर त्यांनी काही सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. त्यानंतर संबंधित विभाग कामाला लागला आहे. रुग्णांवर चांगले उपचार मिळावे, सुविधा मिळावी. याकरिता महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून नवीन इमारत बांधली आहे. आता लवकरच जुन्या बिटको रुग्णालयाचे स्थलांतर होणार असल्याने हे रुग्णांच्या सोयीचे होणार आहे.

Web Title: Old Bytco Hospital Nashikroad Will Shift In 15 Days To New Building Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top