जुने नाशिक: खडकाळी परिसरातील त्र्यंबक पोलिस चौकी मागे असलेले दुमजली पक्के बांधकाम असलेले घर बुधवारी (ता.२०) रात्री साडेनऊच्या सुमारास कोसळले. या दुर्घटनेत खान कुटुंबीयांतील आठ जण मलब्याखाली दबले असले तरी अग्निशामक दलाने सर्वांची थरारक सुटका केली. घटनेत सात जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.