
NMC आयुक्तांनी 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करावा; वृद्ध दाम्पत्य
नाशिक : महापालिकेत आयुक्त रुजू होतात कधी व जातात कधी हेच कळत नाही. नवीन आयुक्त रुजू झाल्यानंतर त्या व्यक्तींना काम करण्याची संधी मिळण्याअगोदरच बदलीच्या बातम्या वाचायला मिळतात.
त्यामुळे तुम्ही तरी तीन वर्ष या पदावर काम कराल, अशी अपेक्षा इंदिरानगर येथील एका दांपत्याने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे व्यक्त करत समस्त नाशिककरांची भावना मांडली. (Old couple met NMC Commissioner chandrakant pulkundwar nashik Latest Marathi news)
महापालिकेची स्थापना झाल्यापासून विलास ठाकूर वगळता एकाही आयुक्तांना तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही. नगरसेवकांप्रमाणेच शहर विकासाच्या आयुक्तांच्या संकल्पना असतात.
त्या संकल्पना अमलात आणण्याचे अधिकार आयुक्तांना असतात, मात्र त्यासाठी पूर्ण कार्यकाळ असावा लागतो. विलास ठाकूर वगळता नाशिक महापालिकेत एकाही आयुक्तांना तीन वर्षाचा पूर्ण कार्यकाळ करता आला नाही. ठाकूर तीन वर्ष चार महिने आयुक्तपदावर होते. त्यापूर्वी व नंतरदेखील एकही आयुक्तांना पूर्ण कार्यकाळ काम करता आले नाही.
२०१२ नंतर वर्ष दीड वर्षातच आयुक्तांच्या बदल्या झाल्या गेल्या महिन्यात १२० दिवस काम केलेल्या रमेश पवार यांची बदली झाली. नाशिक महापालिकेत एक ते दीड वर्ष आयुक्त पदावर नियुक्ती होते व त्यानंतर तत्काळ बदली केली जाते सदरची बाब ही नाशिककरांना खटकत असल्याची जाणीव शुक्रवारी (ता. ५) एका प्रसंगात घडली.
हेही वाचा: 2 दिवसात साडेतेरा हजार तिरंग्याची विक्री; NMC कर्मचाऱ्यांना खरेदी बंधनकारक
महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार शहराचा आढावा घेताना विविध प्रकल्पांना भेट देत आहे. अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या दादासाहेब फाळके स्मारकाला त्यांनी भेट दिली.
या वेळी इंदिरानगर येथील मानकर दांपत्याशी त्यांनी संवाद साधला तब्येतीची विचारपूस केल्यानंतर शहर विकासासंदर्भात सल्ला विचारला. त्या वेळी मानकर दांपत्याने तीन वर्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण करा, असा सल्ला देत अप्रत्यक्षपणे आयुक्तांच्या कमी कार्यकाळाच्या भूमिकेवर बोट ठेवले.
आयुक्तांची बदली हा शासनाचा विषय असला तरी वर्ष दीड वर्षात आयुक्तांच्या बदल्या होत असल्याने विकासाला खेळ बसत असल्याचे व सदरची बाब सर्वसामान्यांना खटकत असल्याचे या निमित्ताने समोर आले.
विकासासाठी आयुक्तांचा संवाद
आयुक्त पुलकुंडवार सध्या शहराच्या विविध कामांचा आढावा घेत असून शहराच्या समस्या जाणून घेण्यासाठी थेट मैदानात उतरणार असल्याचे माहिती त्यांनी दिली. सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न बिकट असल्याने विविध ठिकाणी पाहणी करून तातडीने खड्डे बुजविण्याच्या सूचना ते देत आहे, येत्या काही दिवसात नागरिकांशी थेट संवाद साधून समस्या जाणून घेणार आहेत. त्यानंतर यंत्रणेच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण केले जाणार आहे.
हेही वाचा: जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिरेबंदी प्रवेशद्वार उघडणार!
Web Title: Old Couple Met Nmc Commissioner Chandrakant Pulkundwar Nashik Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..