Nashik News : तब्बल 3 तास संरक्षण जाळीत अडकून पडला वृद्ध! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

old man stuck in protection net

Nashik News : तब्बल 3 तास संरक्षण जाळीत अडकून पडला वृद्ध!

जुने नाशिक (जि. नाशिक) : शिवाजी उद्यानाच्या संरक्षण जाळीत सुमारे तीन तास एक वृद्ध जखमी अवस्थेत अडकून होता. अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून त्याची सुटका करण्यात आली. जिल्हा रुग्णालयात (Hospital) त्याच्यावर उपचार सुरू आहे. (old man was stuck in an injured condition in protection net of Shivaji Udyan for about 3 hours nashik news)

सीबीएस येथील शिवाजी उद्यानास संरक्षण जाळ्या बसवण्यात आले आहे. अनधिकृतरीत्या कोणी आत प्रवेश करू नये, यासाठी जाळ्याचा वरील भाग टोकदार केला आहे. अशा या टोकदार जाळीत एक वृद्ध शनिवारी (ता. ११) सकाळी अडकून पडला होता.

जाळीच्या टोकदार भाग त्याच्या पायाच्या आरपार गेलेला होता. पायातून रक्तस्राव सुरू होता. लक्ष्मण केदु मोगरे (६०, रा. निफाड) असे वृद्धाचे नाव आहे. पहाटेची वेळ असल्याने परिसरात कुणीही नसल्याने वृद्ध तब्बल तीन तास जाळीत अडकून होता. सकाळी सहाच्या सुमारास कालिदास कलामंदिरच्या सुरक्षारक्षकाने अग्निशामक विभागास घटनेची माहिती दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मुख्य अग्निशमन केंद्राचे लीडिंग फायरमन श्याम राऊत, राजू नाकील, इसाक शेख, महेश कदम काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या पाच ते दहा मिनिटात लोखंडी जाळीच्या टोकदार भागात अडकलेल्या वृद्धाची सुखरूप सुटका केली. त्यास भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी जखमी वृद्धास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

स्थानिक नागरिकांकडून तो पहाटे तीन वाजेपासून अडकून असल्याचे सांगण्यात आले. वृद्ध त्या ठिकाणी कशासाठी गेला होता, याची माहिती समजू शकली नाही. त्याची चौकशी केली असता शेळ्या चरण्यासाठी गेल्या आहे, अंगावरील कपडे चुलत भावांनी नेले आहे. असे बोलत असल्याने प्राथमिक दर्शनी तो काहीसा मनोरुग्ण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.

टॅग्स :NashikOld Age