जुने नाशिक- पोलिस आयुक्तालय आणि भद्रकाली पोलिस ठाणे यांच्या माध्यमातून जुने नाशिक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहे. सी.एस.आर निधीतून कॅमेरे बसविले जात आहे. संवेदनशील भागासह संपूर्ण जुने नाशिक परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या कॅमेरा बसवण्याचे काम जोरदार सुरू आहे.