Crime
sakal
नाशिक, जुने नाशिक: द्वारका परिसरात सोमवारी (ता. २९) पहाटे रिक्षाचालकाचा त्याच्याच मित्राने पोटात चाकू भोसकून पाठीवर वार करीत खून केला. मृत रिक्षाचालकाचे विवाहितेशी अनैतिक संबंध असल्याने संशयितांनी याबाबतची माहिती तिच्या पतीला दिली. याच गोष्टीचा जाब संशयितांना विचारल्याने रिक्षाचालकाचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.