सटाणा- डांगसौंदाणे रस्त्यावर चौंधाणे गावाजवळील पुलावर नवीन संरक्षक कठडे बांधण्यासाठी जुने कठडे तोडण्यात आले; परंतु पुलाच्या दोन्ही बाजूंना कोणत्याही प्रकारची संरक्षणात्मक सूचना देण्याची उपाययोजना केली नसल्याने पुलावरून वाहने चालविणे अत्यंत धोकादायक झाले आहे. किमान सावधगिरीचा इशारा देणारे फलक अथवा रिफ्लेक्टर लावावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.