पेंडिंग बातमी...... १७ रोजी पाठवली आहे.....
PHO26B17500
बांबरुड राणीचे (ता. पाचोरा) : शक्तीस्थळावर माजी आमदार ओंकार (आप्पा) वाघ यांना अभिवादनप्रसंगी दिलीप वाघ, संजय वाघ, दगाजी वाघ, खलील देशमुख, विनय जकातदार, ललित वाघ, मधुकर वाघ आदी.
बांबरुड येथे अभिवादन सभा
माजी आमदार ओंकार वाघ यांना आदरांजली
सकाळ वृत्तसेवा
पाचोरा, ता. २१ : बांबरुड राणीचे (ता. पाचोरा) येथील माजी आमदार, शिक्षण व सहकार महर्षी दिवंगत ओंकार (आप्पा) वाघ यांना त्यांच्या चौदाव्या स्मृतीदिनानिमित्ताने आदरांजली वाहण्यासाठी नुकतीच अभिवादन सभा घेण्यात आली.
डॉ. लोहिया माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणातील वाघ यांच्या शक्तीस्थळावर त्यांचे पुत्र माजी आमदार दिलीप वाघ व संजय वाघ यांच्याहस्ते पुष्पांजली वाहून व दीपप्रज्वलन करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी दगाजी वाघ, विनय जकातदार, खलील देशमुख, ललित वाघ, मधुकर वाघ, सतीश चौधरी, प्राचार्य डॉ. वासुदेव वले, डॉ. बी. एन. पाटील, डॉ. एन. एन. गायकवाड, शांताराम चौधरी, प्रा. सी. एन. चौधरी, रणजीत पाटील, अनिल पाटील, अमोल शिंदे, शशिकांत वाघ, प्रदीप वाघ, अरुण पाटील, सुनील पाटील, प्रा. जयश्री वाघ, उज्ज्वला साळुंखे, शिवदास पाटील, प्रा. राजेश मांडोळे, मधुकर पाटील, प्रा. भागवत महालपुरे, डॉ. माणिक पाटील, बी. एस. पाटील, आर. एल. पाटील, नरेंद्र ठाकरे यांच्यासह ‘पीटीसी’ शिक्षण संस्थेच्या विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, वाघ परिवारातील सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील किशोर वाघ बहुउद्देशीय सभागृहात अभिवादन सभा झाली. यात ओंकार (आप्पा) वाघ यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेण्यात आला.
------------------------