ओमप्रकाश अग्रवाल अमृतमहोत्सव

ओमप्रकाश अग्रवाल अमृतमहोत्सव
Published on: 
धुळे टुडे २ साठी... फोटो-NSK26H31425 धुळे : अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ओमप्रकाश अग्रवाल यांचा सन्मान करतांना चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, जयकुमार रावल. शेजारी रक्षा खडसे, अमरिशभाई पटेल, स्मिता वाघ आदी. --- ओमप्रकाश अग्रवाल यशस्वी भीष्म पितामह --- महसूलमंत्री बावनकुळे; अमृतमहोत्सवानिमित्त ११ शेतकऱ्यांना गोदान सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ५ : ओमप्रकाश अग्रवाल हे शहराच्या सामाजिक, राजकीय, सहकार, आध्यात्मिक, उद्योग क्षेत्रातले भीष्म पितामह आहेत. राष्ट्रवादाची प्रेरणा घेत त्यांची जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सुरू झालेली वाटचाल भारतीय जनता युवा मोर्चा आणि भाजपमधील विविध जबाबदाऱ्यांनी युक्त आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले, असे गौरवोद्गार राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ज्येष्ठ उद्योजक ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. ४) येथील खानदेश गोशाळेच्या मैदानावर त्यांचा सन्मान, भजनसंध्या, भक्तिमय गीतगायन, शेतकऱ्यांना गोदानाचा कार्यक्रम झाला. मंत्री श्री. बावनकुळे अध्यक्षस्थानी होते. या वेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, सत्कारमूर्ती अग्रवाल, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार स्मिता वाघ, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार अमरिशभाई पटेल, मंगेश चव्हाण, नंदकिशोर महाजन, काशीराम पावरा, माधवी नाईक, रोहिणी नायडू, मंजुळा गावित, राहुल ढिकले, राम भदाणे, अमोल जावळे, राजेश पाडवी, लक्ष्मण सावजी, महापौर मायादेवी परदेशी, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी प्रमुख पाहुणे होते. मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, की ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवातही अग्रवाल कुटुंबाने दुष्काळी स्थितीचे समाजभान राखत शेतकऱ्यांप्रती आपली संवेदनशीलता दाखवून दिली. ११ शेतकऱ्यांना वासरांसह दुभत्या गायींचे दान करतानाच त्यांनी शासनाच्या दुष्काळ निधीसाठी ११ लाखांचा धनादेश देण्याचे जाहीर केले. मान्यवरांकडून गौरवोद्गार पालकमंत्री रावल म्हणाले, की आई- वडिलांमध्येच देव असतो या भावनेतून आमदार अनुप अग्रवाल यांनी आपल्या वडिलांचा अमृतमहोत्सवाचा अप्रतिम सोहळा घडवून आणला. ओपी शेट यांनी अत्यंत कष्टातून, संघर्षातून जीवनाची वाटचाल केली. विविध आंदोलनांतून भाजपची पाळेमुळे या जिल्ह्यात रोवली. जलसंपदामंत्री महाजन यांनी जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए याची प्रचिती ओपी शेट यांच्या जीवनप्रवासातून येते असे म्हणत ओपी शेट यांचे जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपमधील योगदान पाहता ते आजही आमच्यासाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले. आमदार अग्रवाल म्हणाले, की आज ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत महसूलमंत्री बावनकुळे यांनी आज मोठी भेट दिली आहे. त्यांनी आज रावेर एमआयडीसीसाठी २००० एकर जागा मंजूर केल्याचे सांगितले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com