नाशिकमध्ये सकल मराठा समाजातर्फे गुप्त बैठका?

maratha community
maratha communityesakal

सिडको (नाशिक) : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर समाजात निर्माण झालेल्या अस्वस्थतेला दिशा देण्यासाठी खासदार संभाजीराजे भोसले सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या बैठकीलाही प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ठिकठिकाणी गुप्त बैठका घेतल्या जात आहे.(On-behalf-Maratha-community-Secret-meetings-nashik-marathi-news)

ठिकठिकाणी गुप्त बैठका

शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी जिल्ह्यातून शिवभक्त शनिवारी (ता. ५) दुपारी रायगडाकडे कूच करणार आहेत. तसा निर्धार सकल मराठा समाजाच्या ठिकठिकाणी झालेल्या बैठकांत करण्यात आला.मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर समाजात निर्माण झालेल्या अस्वस्थतेला दिशा देण्यासाठी खासदार संभाजीराजे भोसले सक्रिय झाले आहेत. राज्य सरकारकडे केलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा लक्षवेधी ठरणार आहे. दोन दिवसांत मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले रायगडावरून मराठा एल्गारची घोषणा करण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून मराठा समाजाच्या बैठकांना प्रतिबंध लावला जात आहे. नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या बैठकीलाही प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ठिकठिकाणी गुप्त बैठका घेऊन रायगड वारीचे नियोजन केले जात आहे. छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांच्या निर्देशानुसार मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, राजू देसले, शिवाजी सहाणे, तुषार जगताप, गणेश कदम, शिवा तेलंग, संदीप शितोळे, पूजा धुमाळ, माधवी पाटील यांच्यासारखे आजवर पहिल्या फळीत काम करणारे समन्वयक या वेळी प्रथमच भूमिगत पद्धतीने गुप्त बैठकांना मार्गदर्शन करीत असून, रायगडावर जाण्यासाठीचे नियोजन करण्याची जबाबदारी दुसऱ्या फळीवर सोपविण्यात आली आहे.

maratha community
नाशिकमध्ये 'आप'चे जितेंद्र भावे यांच्यावर गुन्हा दाखल

एसओपी पाळण्याची अट

रायगडाकडे प्रस्थान करण्यापूर्वी शासनाची एसओपी पाळण्याची अट घालण्यात आली आहे. प्रत्येकाने कोविड टेस्ट करून बाधित नसल्याची खात्री करून घ्यावी. एका वाहनात चार व्यक्ती, सोबत मास्क, सॅनिटायझर, दोन दिवस पुरेल इतका कच्चा-पक्का शिधा, पिण्याचे पाणी बाळगण्याच्या सक्त सूचनाही दिल्या जात आहेत. एकूणच आपले हक्क मिळवताना शासकीय अटी-शर्तींचा कुठेही भंग होणार नाही, महामारीचा प्रसार होण्यास आपण निमित्त ठरणार नाही, याविषयी सतर्कता बाळगण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे.

maratha community
मालेगावचा मृत्युदर घसरला; कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com