Gurumauli Annasaheb More : पुरुषोत्तम पूजनाची सेवेकऱ्यांना पर्वणी; गुरुपीठात 22 जुलैला अपूर्व पूजन सोहळा

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More esakal

Gurumauli Annasaheb More : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील श्री गुरुपीठात अधिक मासानिमित्त येत्या २२ जुलैला मासिक महासत्संगाच्या पर्वावर ‘पुरुषोत्तम पूजन’ सोहळा होणार आहे. (On occasion of Purushottam Poojan ceremony held in Gurupeeth on occasion of monthly Mahasatsang on 22nd July nashik news)

अखिल भारतीय श्री स्वामी सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवेकरी परिवाराला पुरुषोत्तम पूजनाची संधी मिळाली आहे. गुरुमाउलींच्या पावन सान्निध्यात सेवेकऱ्यांना पुरुषोत्तम पूजनाचा अपूर्व योग जुळून आला आहे.

मासिक महासत्संगाच्या दिवशी सकाळी आठला भूपाळी आरतीनंतर भगवान श्रीकृष्णाचे पूजन होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : माळकरी, टाळकरी अन् वारकरी हे धर्म, देश, संस्कृतीचे रक्षक : गुरुमाउली

त्यासाठी सेवेकऱ्यांना आपल्या घरातील भगवान श्रीकृष्णांची मूर्ती, अभिषेक पात्र, पूजन साहित्य विष्णुसहस्त्रनामांची पोथी आणावयाची आहे. ही सेवा सर्वांसाठी विनामूल्य आहे.

या वर्षी श्रावण हा अधिकमास असून, मंगळवार १८ जुलैपासून पुरुषोत्तम म्हणजेच अधिक मासाला प्रारंभ होत आहे. अधिक मासामध्ये श्री महाविष्णुंच्या सेवेला म्हणजे ३३ अनारशांच्या दानालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुपीठामध्येच ३३ अनारंशासहित पूजन संच उपलब्ध असणार आहे. तरी या अपूर्व पर्वणीचा सेवेकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गुरुपीठातर्फे करण्यात आले आहे.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : राष्ट्रभक्तीसह दीन, दुःखी, पीडितांची सेवा करा : गुरुमाउली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com