नाशिक- शहरातील वाढत्या व विस्कळित वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नाशिक महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने ऑनस्ट्रीट व ऑफस्ट्रीट पार्किंग झोन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आली असून, प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर सहा चौरस किलोमीटर क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.