आयशरमध्ये आढळले 3 टन मांस

crime
crimeesakal

वणी : वणी- नाशिक रस्त्यावरील ओझरखेड धरणाच्या कालव्याजवळील रस्त्यालगतच्या संरक्षण भिंतीस धडक देऊन अपघातग्रस्त आयशर गाडीत जनावरांचे मांस आढळले. याबाबत वाहन मालक व चालकावरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

crime
Nashik : अज्ञातांनी फोडल्या 3 चारचाकी वाहनांच्या काचा

वणी-नाशिक रस्त्यावरील ओझरखेड धरणाच्या कालव्याजवळील उतारावर असलेल्या संरक्षण भितींस २३ जूनला वणीकडून नाशिककडे जाणारी आयशर गाडी (MH17, BY2487) वरील चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या संरक्षण भितींस धडक देऊन कलंडली गेली. नंतर चालकाने पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता, वाहानाची तपासणी करताना वाहनात सुमारे ३ टन वजनाचे जनावरांचे मांस आढळले. याबाबत पोलिसांनी वाहन मालक वसीम अब्दुलकरीम कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) व वाहनचालकाविरुद्ध अवैध मांस वाहतूक व अपघातप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुमारे दीड लाखाचे मांस व साडेचार लाखांचे वाहन, असा सहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण उदे व हवालदार एम. एल. बर्डे तपास करीत आहेत.

crime
मटणाच्या पार्टीला न बोलावल्याचा रागातून झालेल्या भांडणातून एकाचा खून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com