दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन 93 एकूण गणेशमूर्ती संकलित

Ganesh Visarjan news
Ganesh Visarjan newsesakal
Updated on

पंचवटी (जि. नाशिक) : परंपरेनुसार गुरुवारी (ता. १) दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. महापालिका प्रशासनाने नियोजन केले होते. या वर्षी पंचवटी विभागात एकूण ९३ गणपती बाप्पाच्या मूर्ती संकलित करण्यात आल्या. शहरात घरोघरी गणपती बाप्पाचे बुधवारी (ता. ३१) आगमन झाले. (One half day immersion of Bappa 93 total Ganesha idols collected Nashik Latest Marathi News)

यंदा दहा दिवसांनी गणरायाचे विसर्जन होणार आहे. मात्र, परंपरेनुसार काही नागरिक दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन करतात. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने योग्य नियोजन केले होते. विसर्जनस्थळी प्रत्येकी चार ते पाच मनपा कर्मचारी होते.

हे कर्मचारी गणेश भक्तांकडून निर्माल्य संकलन केले आणि मनपाच्या बांधकाम विभागामार्फत गणेशमूर्ती दान स्वरूपात घेतल्या. गोदाघाट परिसरात रामकुंड ११, तपोवन कपिला संगम १६, नांदूर घाट २९, म्हसरूळ येथील सीता सरोवर ३७ ही नैसर्गिक ठिकाणी एकूण ९३ गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या. नदी प्रदूषण रोखण्याबरोबरच पर्यावरण रक्षणाला हातभार लागावा, हा यामागचा उद्देश सफल झाल्याचे दराडे यांनी सांगितले.

काही नागरिकांकडून घरच्या घरी निरोप

या वर्षी शाडू मातीच्या गणपती बाप्पाला चांगलीच मागणी होती. या मागचा उद्देश व हेतू हा घरच्या घरी बाप्पाला विसर्जन करता यावे. दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी काही नागरिकांनी कृत्रिम तलाव तयार केले होते आणि गणपती बाप्पाला निरोप देत घरच्या घरीच विसर्जन केले. गोदाघाट परिसरात पंचवटी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची पुरेपूर काळजी घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sinnar Samruddhi Expressway robbery
Nashik Kumbh Mela
Nashik Shalarth Scam
Nashik tourists stranded in Nepal flood
Marathi News Esakal
www.esakal.com