नाशिक- बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर आता विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाचे वेध लागले आहेत. पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सुमारे एक लाख जागा उपलब्ध आहेत. पारंपरिक, व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध आहेत. असे असले तरी मागणी असलेले अभ्यासक्रम, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चांगली स्पर्धा पाहायला मिळणार आहे.