Nashik News: खड्ड्याने घेतला आणखी एका महिलेचा बळी! 2 घटनांमध्ये दुचाकी दुभाजकाला धडकून दोघे ठार

 Accident news
Accident newsesakal

नाशिक : हिरावाडी रोडवरील अगरबत्ती चौकात दुचाकी खड्ड्यात आदळून पाठीमागील महिला पडल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशा प्रकारची ही दुसरी घटना असून, गेल्या महिन्यात नाशिक- पुणे रोडवर खड्ड्यात दुचाकी आदळून पाठीमागे बसलेल्या महिलेचा बळी गेल्याची घटना घडली होती.

तर, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दुचाकी दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. (One more woman killed in accident by potholes In 2 incidents two were killed when two wheeler collided with divider Nashik News)

प्रभादेवी बाबूराव यादव (५२, रा. विघ्नहर्ता अपार्टमेंट, हिरावाडी, पंचवटी) असे मयत महिलेचे नाव आहे. रविवारी (ता. १) सकाळी अमोल यादव हा दुचाकीवर आई प्रभादेवी यांना घेऊन जात होता. अगरबत्ती चौकातील खड्ड्यात त्याची दुचाकी आदळली असता, प्रभादेवी रस्त्यावर पडल्या. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचार सुरू असताना त्यांचा मंगळवारी (ता. ३) मृत्यू झाला.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच, त्र्यंबक रोडवर दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात अतुल नामदेव कुमावत (२५, रा. उत्कर्ष नगर, त्र्यंबक रोड) याचा मृत्यू झाला. सदर घटना सोमवारी (ता.२) रात्री घडली.

या अपघातामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी सामाजिक कार्यकर्ते अक्षय धांडे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

 Accident news
Nashik News: जमा-खर्चाची माहिती सादर न झाल्यास कारवाई; आयुक्तांकडून सर्व विभागांना अल्टिमेटम!

तर दुसऱ्या घटनेमध्ये मंगळवारी (ता.३) रात्री एकच्या सुमारास ललन गंगा यादव (३२) हे उमेश यादव (४२, रा. आडगाव) यांना दुचाकीवर घेऊन मुंबई- आग्रा उड्डाणपुलावरून आडगावच्या दिशेने जात होते. अमृतधाम चौकात त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजकावर जाऊन धडकले.

या अपघातामध्ये उमेश यादव यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंकजकुमार यादव यांच्या फिर्यादीनुसार, उमेश यादव यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ललन यादव यांच्याविरुद्ध पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पंचवटी पोलिसांनी ललन यादव यास अटक केली आहे. उपनिरीक्षक वाय. एस. माळी तपास करीत आहेत.

 Accident news
Kamgar Kalyan Natya Spardha : आत्मभान जागविणारे ‘काय डेंजर वारा सुटलाय!’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com