NSK26H31914
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘वन नेशन, वन सबस्क्रिप्शन-यूजर अवेअरनेस’बाबत मार्गदर्शन करताना मान्यवर.
---------
‘वन नेशन, वन सबस्क्रिप्शन’बाबत विद्यापीठात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १० : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ज्ञान स्त्रोत केंद्र आणि व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेतर्फे ‘एमराल्ड पब्लिशिंग’ यांच्या सहकार्याने ‘वन नेशन, वन सबस्क्रिप्शन’ वापरकर्त्यांमध्ये जनजागृतीवर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम झाला. कार्यक्रमात प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार डिजिटल शैक्षणिक संसाधनांचा प्रभावी वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यापीठातील संशोधन व अध्यापनाची गुणवत्ता वाढविणे, संशोधकांना दर्जेदार ई-संसाधने उपलब्ध करून देणे आणि उपलब्ध संशोधन साहित्याचा प्रभावी वापर करण्यास प्रोत्साहन देणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. चंद्रशेखर वाणी यांनी प्रास्ताविकात संशोधन प्रक्रियेत डिजिटल माहिती संसाधनांचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रमुख मार्गदर्शक व संसाधन व्यक्ती वंदना महाजन यांनी ‘वन नेशन, वन सबस्क्रिप्शन’ या राष्ट्रीय उपक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे आणि शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व विशद केले.
यावेळी व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालिका प्रा. मधुलिका सोनवणे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. पवित्रा पाटील, पदव्युत्तर विभागाचे प्रमुख प्रा. रमेश सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन धनश्री शिरोडे यांनी मानले.
-----