धुळे टुडे २ साठी...
---
फोटो- NSK26H32247
धुळे : प्रा. रघूनाथ केले वाक्-श्रवण विद्यालयात विद्यार्थ्यांना वही-पेन वाटपप्रसंगी देवरे तंत्रनिकेतनचे विद्यार्थी.
---
‘एक पेन, एक वही’ उपक्रमाने
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
---
देवरे तंत्रनिकेतनचा स्तुत्य उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ : श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे तंत्रनिकेतनमधील संगणक अभियांत्रिकी विभागाच्यावतीने महात्मा गांधी जयंती सप्ताहाचे औचित्य साधून ‘एक पेन, एक वही-शिक्षणाकडे वाटचाल’ हा स्तुत्य सामाजिक उपक्रम घेण्यात आला. यात शहरातील प्रा. रघुनाथ केले वाक्-श्रवण विद्यालय व मातोश्री वसतिगृहातील गरजू मूकबधिर विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य हाती पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, त्यांच्यात शिक्षणाची आवड व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. ‘एक पेन, एक वही’ या छोट्याशा योगदानातून सामाजिक बांधिलकी जपली जावी आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे हा या उपक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमादरम्यान तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी वाक्-श्रवण विद्यालयातील विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधून त्यांना शिक्षणाचे महत्त्व व भविष्यातील संधींबाबत मार्गदर्शन केले. मार्गदर्शन : तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. संजय हिरे आणि संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. निशाद पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. श्रद्धा हजारी व प्रा. रिद्धी पाटील यांनी उपक्रमाचे नियोजन केले. संगणक अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाचे विद्यार्थी, शिक्षक व केले मातोश्री वसतिगृह व्यवस्थापनाचे विशेष सहकार्य लाभले.
---