Nashik News : BJP नेत्याच्या टॉर्चरिंगला कंटाळून एकाची आत्महत्या!

Death News
Death Newsesakal

घोटी (जि. नाशिक) : भरवीर खुर्द येथील युवक अनिरुद्ध धोंडू शिंदे ( वय ३२ ) याने स्वतःच्या घरात विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये नाशिक येथील भाजपच्या बड्या नेत्यासह माजी नगरसेवकाचे नाव टाकत त्यांना जबाबदार धरण्यात यावे असे म्हटले आहे.

यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. युवकाची पत्नी वैशाली शिंदे यांनी घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (One person committed suicide after being fed up with BJP leader torture Nashik News)

‘अनिरुद्ध शिंदे याने आपल्याला वारंवार टॉर्चर केले जात होते तसेच न केलेल्या गुन्ह्यात गोवण्यात भाजपच्या नेत्यासह माजी नगरसेवक यांचा हात असून आपल्या मित्रांना देखील त्रास देत असल्याने विषप्राशन करत असल्याचे नोटमध्ये म्हटले आहे.

यामध्ये भाजप नेते विक्रम नागरे व माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या दोघांनीही मला माझ्या कुटुंबीयांपासून लांब केल्याचे व कुटुंबातील सदस्यांना देखील त्रास देत असल्याने आपण जीवनयात्रा संपवत असल्याचे चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Death News
Nashik News: निफाड नगरपंचायतीत अनागोंदी कारभार; माजी नगराध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सायंकाळी अनिरुद्ध शिंदे यांच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात गर्दी करत संशयित आरोपींना अटक करा अशी मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दर्शवला होता. पोलिसांनी अखेर नातेवाईकांशी समन्वय साधून मृतदेह ताब्यात देत त्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिरुद्ध शिंदे हा मोक्कातील आरोपी असून तो दोन महिन्यासाठी संचित रजेवर घरी आला होता. मृत अनिरुद्ध हा भाजप नेत्याच्या गुन्हेगारी घटनांतील पंटर असल्याचे म्हटले जात आहे. संशयित आरोपी अजून ताब्यात घेतले नसून कारवाई सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर घटनेचा तपास करत आहेत.

Death News
Nashik News : खासगी बाजारात शेतमालाला हमीभावापेक्षा अधिक दर; उत्पादन व मागणीचा असमतोल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com