esakal | जिल्‍ह्यात 1 हजार 661 पॉझिटिव्‍ह, दोन हजार 084 कोरोनामुक्‍त
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

जिल्‍ह्यात 1 हजार 661 पॉझिटिव्‍ह, दोन हजार 084 कोरोनामुक्‍त

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : जिल्‍ह्यात नव्‍याने आढळलेले कोरोना बाधितांची संख्या घटली असतांना मृत्‍यूसत्र सुरुच आहे. बुधवारी (ता.19) जिल्‍ह्यात चाळीस बाधितांचा कोरोनामुळे बळी गेला असून, यात सर्वाधिक 22 मृत नाशिक ग्रामीणमधील आहेत. जिल्‍ह्यात एक हजार 661 पॉझिटिव्‍ह आढळले असून, दोन हजार 084 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांत 463 ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात 18 हजार 030 बाधितांवर उपचार सुरु आहेत. (One thousand 661 corona patients found in Nashik district)बुधवारी झालेल्‍या चाळीस मृतांमध्ये नाशिक ग्रामीणमधील 28 तर नाशिक शहरातील अठरा मृतांचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये सर्वाधिक सहा बळी सिन्नर तालुक्‍यातील आहेत. निफाड तालुक्‍यातील चार, दिंडोरी व बागलाण तालुक्‍यातील प्रत्‍येकी तीन, येवला व नांदगाव तालुक्‍यातील प्रत्‍येकी दोन तर इगतपुरी व सुरगाणा तालुक्‍यातील प्रत्‍येकी एक बाधिताचा कोरोनाने बळी घेतला आहे. नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील 605, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 049, मालेगावच्‍या 7 बाधितांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. कोरोनामुक्‍त रुग्‍ण संख्येत नाशिक शहरात 858, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 166, मालेगाव महापालिका क्षेत्रातील साठ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस रुग्णांच्या आकडेवारीत तफावत

सायंकाळी उशीरापर्यंत चार हजार 232 अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील दोन हजार 679, नाशिक शहरातील एक हजार 234 तर मालेगावच्‍या 319 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार 931 रुग्‍ण दाखल झाले आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 779 रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात दोन, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात नऊ रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये 131 तर मालेगावच्‍या दहा रुग्‍णांचा समावेश आहे.

हेही वाचा: तौक्ते चक्रीवादळानंतर नाशिक जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत

loading image