नाशिक जिल्ह्यात अवघे हजार नोंदणीकृत घरेलू कामगार; अनेकजण शासनाच्या लाभापासून वंचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

House Worker

नाशिक जिल्ह्यात अवघे हजार नोंदणीकृत घरेलू कामगार...?

पल्लवी शुक्ल : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : कोरोना (Corona) महामारीत घरेलू कामगारांसह कामगारांना शासकीय योजना जाहीर करीत लाभ देणारा राज्य शासनाचा योजना ह्या कागदावरच आहेत का, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. त्याला निमित्तही तसेच असून ६१ लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात २३ हजार ५०८ घरेलु कामगारांची नोंदणी झाली होती. कोरोना महामारी अन्‌ या कामगारांमध्ये जनजागृतीचा अभाव आदी कारणांमुळे अवघे १ हजार ११२ कामगारांनी पुर्ननोंदणी केली असल्याची बाब शासनाने मार्च २०२२ अखेर केलेल्या पाहणीत उघडकीस आली आहे.

महाराष्‍ट्र राज्‍य घरेलु कामगार कल्‍याण मंडळाची २०११ मध्ये स्थापना झाली. साधारण एका तपाची वाटचाल करणाऱ्या या मंडळात नाशिक जिल्ह्यामध्ये घरेलु कामगार अधिनियमांतर्गत घरेलु कामगारांची नोंदणी सुरू आहे. मात्र त्याला अल्प प्रतिसाद आहे. कोविड-१९ (Covid- 19) अंतर्गत घरेलु कामगारांना आर्थिक साहाय्य करण्याची घोषणा शासनाने केली आहे. सक्रिय व जीवित नोंदणी असलेल्‍या घरेलु कामगारांना प्रत्‍येकी दीड हजार रुपये या प्रमाणे ३४ लाख ५१ हजार ५०० इतका निधी उपलब्‍ध करून दिला. मात्र नोंदणीकृत घरेलू कामगारांमध्ये कागदपत्र व अन्य बाबी पूर्ततेविषयी म्हणावा तसा पाठपुरावा न झाल्याने कागदपत्रांअभावी आलेला हा निधी शासनाकडे जमा होणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: इंधन दरवाढीने जेसीबी, पोकलेन, डंपरच्या भाडेदरांत वाढ

वाटपातील अडचणी

बँक तपशिल, मोबाईल नंबर इ. निवासाची माहिती उपलब्‍ध नसल्‍याने खात्‍यावर रक्‍कम जमा करण्यासाठी अडचणी. हयात आहे किंवा नाही याची खातरजमा सुरू.

''घरेलू कामगारांच्या नोंदणी संदर्भात कामगार उपायुक्त वि.ना. माळी यांच्या मार्गदर्शनात गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहेत. दुर्दैव असे की जिल्ह्यातील एकही घरेलू कामगाराला शासनाच्या प्रसूती मदत निधी देऊ शकले नाही. त्याचा लाभ मिळावा, असा एकही परिपूर्ण अर्जही आला नाही.'' - शर्वरी अ. पोटे, सहाय्यक कामगार आयुक्‍त

नोंदणीसाठी कुठे संपर्क साधाल

वि. ना. माळी कामगार उप–आयुक्‍त, नाशिक विभाग, सातपूर, आयटीआय सिग्नल, नाशिक कार्यालय
घरेलु कामगार महिला नोंदणीसाठी आवश्‍यक कागदपत्रे :नोंदणी फॉर्म, आधार कार्ड, बँकेचे पासबुक.
नोंदीत घरेलु कामगारांचे नूतनीकरण, बँक तपशिल माहिती अद्ययावत करणेकरीता https://public.mlwb.in/public या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

हेही वाचा: Crime Alert | शहरात घरफोड्यांची 'हॅटट्रीक'

नाशिक जिल्हा दृष्टीक्षेपात

घरेलु कामगार : २३५०८
नूतनीकरण करणाऱ्यांची संख्या १,११२
सन्मानधन योजना लाभार्थी : १६० (एकूण रक्कम : १६ लाख)
जनश्री विमा योजना लाभार्थी : २४४ ( एकूण रक्‍कम : एक लाख ४६, ४००)
अंत्‍यविधी अर्थसाहाय्य लाभार्थी : ५ (रक्‍कम दहा हजार)
प्रसूती लाभ अर्थसाहाय्य लाभार्थी : ०
कोविड अर्थसाहाय्य लाभार्थी : ३०१२ (प्रत्येकी दीड हजार; एकूण रक्‍कम ४५ लाख १८ हजार)

Web Title: One Thousand Registered Domestic Workers In Nashik District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top