आशेवाडीत ‘एक पेड माँ के नाम’ वृक्षारोपण

आशेवाडीत ‘एक पेड माँ के नाम’ वृक्षारोपण
Published on: 
फोटो : ३१२०३ आशेवाडी (ता. दिंडोरी): येथे एक पेड मॉ के नाम उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करताना शेखर रौंदळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील आदी … आशेवाडीत ‘एक पेड माँ के नाम’ वृक्षारोपण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२ : दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी (रामशेज) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिवस साजरा करण्यात आला. ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. पाणी व स्वच्छता विभागांतर्गत राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे संचालक शेखर रौंदळ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. शेखर रौंदळ म्हणाले, गावाच्या समृद्धीचा मार्ग स्वच्छतेतून जातो. प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतेचा अंगीकार केल्यास गाव स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल. स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून त्यासाठी नागरिकांच्या वर्तनात सकारात्मक बदल होणे महत्त्वाचे आहे. लोकसहभागातून अनेक गावांचा कायापालट झाला असून स्वच्छता अभियानामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही सकारात्मक परिणाम झाले आहेत. त्यामुळे सर्व गावांनी घनकचरा नियम २०२६ चे पालन करून कचऱ्याचे चार प्रकारे वर्गीकरण व संकलन करावे, असे आवाहन त्यांनी केले. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे, सरपंच साहेबराव माळेकर, उपसरपंच शारदा बोडके, सदस्य संजय बोडके, संदीप कापसे, कैलास कापसे, ग्रामपंचायत अधिकारी अतुल सोनवणे, प्रमिला माळेकर, जयश्री गायकवाड, शंकर गाडगे तसेच जिल्हा कक्षातील भाग्यश्री बैराग, विशाल हांडोरे, राजेश मोरे, संदीप जाधव, रवींद्र बाराथे, गुलाब गायकवाड, सचिन गवळी, सचिन गोवर्धने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com