Onion Crisis : कांद्याला प्रतिक्विंटल 2 हजार अनुदान द्या; किसान सभेची मागणी

kisan sabha giving letter
kisan sabha giving letter esakal

नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदा पिकास प्रति क्विंटल दोन हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करीत आज (ता.१) किसान सभेतर्फे निवेदन देण्यात आले.

किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष राजू देसले, जिल्हाध्यक्ष देविदास भोपळे, उपाध्यक्ष प्रकाश भावसार, निवृत्ती कसबे, सुमन साळुंखे, केवळ बोरसे, सखाराम खैरनार, सर्जेराव कोरे, ताराबाई बोरसे, तुकाराम सोनवणे, माणिक हिरे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी आदीच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे यांना निवेदन देण्यात आले. (Onion Crisis Give subsidy of 2 thousand per quintal for onion Demand of Kisan Sabha nashik news)

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

जिल्ह्यात कांद्याचे दर पडल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. शासनाने नाफेडतर्फे कांदा खरेदी सुरू केली असली तरी त्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कांद्याचा विषय चांगलाच पेटला आहे. यंदाच्या वर्षी कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जगणे मुश्कील झाले आहे. त्याच प्रमाणे कपाशी पिकांचे भाव देखील खूप कमी झाले आहेत. ते वाढवून देण्यात यावे. सोयाबीन पिकाचे देखील भाव कमी झाले आहेत. ते वाढवून देण्यात यावे, आमच्या मागण्यांकडे लक्ष देण्यात यावे.

अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच किसान सभा यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा यावेळी देण्यात आला. कृषीच्या सर्व पिकास एम.एस.पी. शेतमालाला आधार मूल्य देण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

kisan sabha giving letter
Nashik News : जिल्ह्यातील हजार गावांसाठी साडेसहा कोटीचा टंचाई आराखडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com