Onion Crisis: उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही : विशाल सिंग

Onion
Onionesakal

: कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेत चांगल्या प्रकारे कांद्याची खरेदी केली जाईल, अशी माहिती राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघाचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी दिली.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क वाढविल्याने अडचणीत आलेल्या कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली.

परिणामी, जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक वाढला आहे. आज सकाळी पुन्हा काही बाजार समितीत कांदा लिलाव बंद पडले. या साऱ्या पार्श्वभूमीवर आज सिंग यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करीत त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. (Onion Crisis Producer farmers will not suffer Vishal Singh nashik)

श्री. सिंग म्हणाले, की कांद्याच्या प्रश्‍नावर केंद्र सरकारच्या यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. ‘नाफेड’च्या १३ कांदा खरेदी केंद्रांशिवाय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघातर्फे (एनसीसीएफ) २६ केंद्रांतर्फे खरेदी सुरू केली.

शासनाच्या आदेशानुसार नाशिकला आलो आहे. आतापर्यंत जवळपास दोन हजार ७०० टन कांदा खरेदी करून तेलंगणा, दिल्ली, आसाम, आंध्र प्रदेश, कर्नाटकसह विविध सहा राज्यांत कांदा पाठविला.

विशेष म्हणजे कांदा खरेदीच नव्हे, तर तातडीने शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. परिस्थितीनुरूप निर्णय घेताना अगदी वेळप्रसंगी थेट एक लाख टनापर्यंत कांदा खरेदीचा विचार केला जाईल, अशी तयारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकला ९० टक्के खरेदी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा बाजार समितीत खरेदीचा विचार केला जाईल. केंद्रीय अधिकारी स्थानिक यंत्रणांच्या संपर्कात राहून तक्रारी सोडवतील. ‘एनसीसीएफ’ने राज्य सहकार विभागाशिवाय बाजार समित्यांशी संपर्क वाढविला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Onion
Onion : कांदा खरेदी केंद्रे वाढवावीत मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

स्थानिक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून माहितीचे आदानप्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, महाराष्ट्रात नाशिक ८९.५५ टक्के, पुणे ५.२३, छत्रपती संभाजीनगर २.२१, अहमदनगर १.६७, सोलापूर ०.१७, धुळे १.१८ याप्रमाणे कांदा खरेदी करण्यात आला.

पश्चिम बंगाल, ओडिशा, चंडीगड, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, पंजाब, हिमाचल प्रदेशला कांदा पाठविला गेला.

- खरेदी केलेला कांदा १,५०,०३५.९५ टन

- लासलगाव, पिंपळगाव, उमराणे, मुंगसे, मालेगाव, नामपूरला खरेदी

- मनमाड, पारनेर, वैजापूर, अहमदनगर, सोलापूर, धुळ्यात साठवणूक

- लवकरच अतिरिक्त खरेदी केंद्रे सुरू करण्याचा विचार

- नाशिक जिल्ह्यातून खरेदी केलेला २२०० टन कांदा वितरित

Onion
Maharashtra Onion News : भारतीय कांद्याला बांगलादेश बाजारपेठ दुरावण्याची भीती? पाकिस्तानचा कांदा स्वस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com