कसमादेत कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांची चिंता वाढली

कसमादेत कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांची चिंता वाढली
Published on: 
पान तीन सेकंड मेन --------------------- 16231 वडेल : कांदा पिकावर करपा रोगाचा झालेला प्रादुर्भाव ----- कसमादेत कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांची चिंतेत वाढ; उत्पादनात घट होण्याची शक्यता वैभव सोनवणे : सकाळ वृत्तसेवा वडेल, ता. १३ : कसमादेत एकीकडे दुष्काळाचे सावट असताना दुसरीकडे जेमतेम अल्प पाण्यावर जगविलेल्या कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. राज्यात सध्या थंडीचा जोर वाढत असून अनेक भागांत तापमानात घट झाली आहे. या बदलत्या वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत कांदा पिकावर करपा रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. कांद्याच्या पातीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाची वाढ खुंटण्याची आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. कांदा पिकासाठी थंडीचे वातावरण पोषक मानले जात असले, तरी ढगाळ हवामान, पहाटेचे धुके आणि वातावरणातील बदल यामुळे पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. याशिवाय मावा या रसशोषक किडीमुळे कांद्याच्या पातीतील रस शोषला जात असल्याने पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. कांदा पिकाबरोबरच गहू आणि हरभरा या रब्बी पिकांनाही बदलत्या वातावरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. आधीच पाणीटंचाई आणि वाढत्या शेती खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रोगराईचे नवे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, कांदा पिकावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करावी. रोगाची लक्षणे दिसून आल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य बुरशीनाशकाची फवारणी करावी. दरम्यान, दुष्काळाचे सावट आणि बदलत्या हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले असून, पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.