Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे कांदा पिक धोक्यात; चिखल तुडवत तहसीलदार मुळीक यांची पाहणी

farmer Kashinath Dalvi. While going to the field and inspecting the onion crop, Tehsildar Sachin Mulik etc at At Pohali, Tal. Surgana.
farmer Kashinath Dalvi. While going to the field and inspecting the onion crop, Tehsildar Sachin Mulik etc at At Pohali, Tal. Surgana. esakal

Unseasonal Rain Crop Damage : तालुक्यात दोन दिवसापुर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा शेती भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सचिन मुळीक यांनी आज तालुक्यातील विविध भागातून नुकसानग्रस्त पीकपाणीचा पाहणी दौरा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. (Onion crop in danger due to unseasonal rain Inspection of Tehsildar sachin Mulik at palasan nashik news)

तालुक्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे आंबा कादा, गहु, स्ट्रॉबेरी, तसेच घराची मोठ्याप्रमाणात नुकसान होऊन असंख्य शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. तालुक्यातील शेतकरी हा कोरडवाहू खरीप शेतीवर अवलंबून आहे. वर्षभरात एकच पिक घेतले जाते.

उन्हाळा सुरू होण्यापूर्वी पासून ते पीक हाती येईपर्यंत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च येतो. यावेळी हाता तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे.

त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी कोलमडला असून झालेल्या संपूर्ण खर्चाची नुकसान भरपाई शासनाने देण्याची मागणी केली जात आहे. तहसीलदार सचिन मुळीक यांनी तालुक्याच्या विविध भागातून पीकपाणी नुकसानीचा पहाणी दौरा सुरू केला असून शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.

यावेळी तहसीलदार मुळीक यांनी तालुक्यातील साजोळे,हदगड,बोरगाव, खोकरी,आदी ठिकाणी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन तहसीलदार सचिन मुळीक यांनी शेतकऱ्यांना दिले असून तालुक्यातील ईतर ठिकाणी प्रशासनाने आदेशीत केल्यानुसार तलाठी, ग्रामसेवक कृषी सहाय्यक हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करण्याचे कार्यवाही सुरू आहे.

"पंचनामा करण्याचे काम तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांनी सुरू केले असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणताही बाधित शेतकरी शिल्लक असल्यास, पंचनामा करण्यासाठी तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून पंचनामा पूर्ण केला जाऊ शकतो."- सचिन मुळीक, सुरगाणा तहसीलदार

फोटो -

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com