Latest Marathi News | Super Phosphateमुळे कांद्याचे नुकसान; मंगरुळला शेकडो एकरवरील पिक नष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

onion crop damage reference image

Super Phosphateमुळे कांद्याचे नुकसान; मंगरुळला शेकडो एकरवरील पिक नष्ट

वडनेर भैरव (जि. नाशिक) : चांदवड तालुक्यातील मंगरूळ व शिवाजीनगर या गावांमधील शेतकऱ्यांनी लागवड केलेले कांदा पिक एका कंपनीच्या सिंगल सुपर फॉस्फेट या खतामुळे जळून गेल्याचा प्रकार घडला. यात ठराविक शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या असल्या तरी हा आकडा मोठा असून, कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.

या शेतकऱ्यांनी चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देऊन कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. (Onion damage due to Super Phosphate Hundreds of acres of crops destroyed in Mangrul Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: नाशिक : विजेच्या धक्क्याने मुलीसह महिलेचा मृत्यू

तालुक्यातील शिवाजीनगर व मंगरूळ परिसरातील शेतकऱ्यांनी मंगरूळ येथील पवार ॲग्रो कृषी दुकानातून एका नामांकित कंपनीच्या सूर्यफूल नावाने असलेले सिंगल सुपर फॉस्फेट खत कांदा लागवड करताना व कांद्याचे रोप टाकताना जमिनीवर टाकले होते. कांदा लागवड झाल्यानंतर आठ दिवसांनी कांदा पिकात खतामुळे मर दिसू लागली.

शेतकऱ्यांनी दुकानदार व कंपनीकडे तक्रार केली. कंपनीने खताचा डेमो घेतला. कृषी विभागाने पंचनामा केला आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना कुठलेही ठोस आश्‍वासन किंवा मदत मिळालेली नाही. याप्रश्‍नी कंपनीवर कारवाई होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर शिवाजी पवार, बबन चव्हाण, कांतीलाल चव्हाण, शिवाजी चव्हाण, विठ्ठल घोलप, सुनील ढगे यांच्या सह्या आहेत.

हेही वाचा: Crime : मालेगावात घरफोडीचे सत्र सुरुच; वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या घरी चोरी

Web Title: Onion Damage Due To Super Phosphate Hundreds Of Acres Of Crops Destroyed In Mangrul Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..