लासलगाव- केंद्र सरकारने १ एप्रिलपासून कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क पूर्ण हटवले. परंतु त्याचा बाजारभावावर कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही. उलट लासलगाव, पिंपळगाव, निफाड आदी प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर ६०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरले. या दरात उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.