अरब राष्ट्रांत कांद्यामध्ये स्पर्धा; भारतातून निर्यात मंदावली

onion
onionesakal

नाशिक : भारतामध्ये देशांतर्गत कांद्याला चांगला (onion rates) भाव मिळत असल्याने निर्यातीचा वेग मंदावला आहे. दुबईसह अरब राष्ट्रांमध्ये सध्या तुर्कस्थान, इजिप्त अन्‌ पाकिस्तानच्या कांद्यामध्ये स्पर्धा चाललीय. तुर्कस्थानचा कांदा टनाला ४०० डॉलर, इजिप्तचा ३७५ ते ४२५ डॉलर, पाकिस्तानचा ३७० ते ४०० डॉलर असा भाव आहे. इराणमधील व्यापाऱ्यांनी पंधरा दिवसांनी पोच होणाऱ्या कांद्यासाठी टनाला ३७० डॉलरचा भाव आयातदारांना देण्यास सुरवात केली आहे. तसेच, लंडनसह युरोपच्या बाजारपेठेत हॉलंडच्या ३० रुपये किलो भावाच्या कांद्याचा बोलबाला आहे.

दुबईमध्ये तुर्कस्थानसह इजिप्त अन्‌ पाकचा कांदा
श्रीलंकेतील व्यापाऱ्यांसाठी तुर्कस्थानच्या निर्यातदारांनी टनाला कांद्याला ४२५ डॉलर असा भाव दिला आहे. सध्यस्थितीत भारतीय कांदा निर्यात करण्यासाठी टनाचा भाव ६२० ते ६५० डॉलरपर्यंत पोचला आहे. पाकिस्तानच्या नवीन कांद्याला आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने किलोला अडीच रुपयांनी भाव कमी करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमधील व्यापारी एकात्मिक तपासणी नाक्यापर्यंत ४०० डॉलर टन या भावाने कांदा पाठवतात. तेथून पाकिस्तानचे निर्यातदार अफगाणिस्तानचा कांदा ४३० डॉलर टन या भावाने पुढे पाठवत आहेत. चीनमध्ये कांद्याची साठवणूक सुरवात झाली आहे. महिन्याभरानंतर हा कांदा विक्रीसाठी बाहेर येईल. चीन

onion
चीन हायपरसॉनिक मिसाइलमधुनही करु शकतो अणवस्त्र हल्ला...दिवसभरात भावात चढ-उतार

कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेत आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशी सकाळी आवक वाढल्याने कांद्याच्या भावात किलोला एक ते दोन रुपयांनी घसरण झाली होती. दुपारनंतर आवक कमी होताच, सायंकाळनंतर पुन्हा किलोला एक रुपयांनी भावात वाढ झाली. लासलगावमध्ये उन्हाळी कांद्याचा क्विंटलचा भाव ३ हजार ६३९ रुपये असा जवळपास कायम राहिला. पिंपळगाव बसवंतमध्ये मात्र शनिवारी (ता. १६) ४ हजार २०० रुपये क्विंटल या भावाने उन्हाळ कांदा विकला गेला आणि आज त्यास ४ हजार १ रुपये असा अधिकचा भाव मिळाला. येवल्यात क्विंटलला २१२ रुपयांनी भाव कमी होऊन साडेतीन हजार, तर कळवणमध्ये ७०० रुपयांनी भाव कमी होऊन ३ हजार ८००, तर मुंगसेमध्ये ३ हजार ४००, चांदवडमध्ये ३ हजार ४८६, मनमाडमध्ये ३ हजार २००, देवळ्यात ३ हजार ३५०, सटाण्यात ३ हजार ८२५, नामपूरमध्ये ३ हजार २८५ रुपये क्विंटल असा अधिकचा भाव निघाला. लासलगावमध्ये नवीन लाल कांद्याच्या भावात साडेचारशे रुपयांनी घसरण होऊन २ हजार १०० रुपये क्विंटल असा भाव राहिला. मुंबईत साडेतीन हजार, पुण्यात ३ हजार ६०० आणि नागपूरमध्ये लाल कांदा साडेतीन हजार व सोलापूरमध्ये लाल कांदा ४ हजार १७५ रुपये क्विंटल या कमाल भावाने विकला गेला.

onion
शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजप नेत्यासह आणखी 4 जणांना अटक
उन्हाळ कांद्याला मागणीची कारणे
मध्यप्रदेशात साठवलेला कांदा पंधरा ते वीस टक्के शिल्लक आहे. दुसरीकडे मात्र दक्षिणेत कांद्याचे नुकसान झाले असून बाजारात पोचणाऱ्या कांद्यापैकी ७० टक्के कांद्याचे पावसाच्या पाण्यामुळे लवकर नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. राजस्थानमध्ये दिवाळीनंतर कांद्याची आवक वाढणार असून मध्यप्रदेशातील नवीन कांदा बाजारात येण्यास महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे. गेल्यावर्षी नाशिक जिल्ह्यातील नवीन लाल कांदा ऑक्टोंबरपासून बाजारात येण्यास सुरवात झाली होती. सध्यस्थितीत नवीन लाल कांदा विक्रीसाठी येतोय, परंतु त्याचे प्रमाण कमी आहे. नाशिक जिल्ह्यातील नवीन लाल कांद्याची आवक वाढण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. ही सारी परिस्थिती देशातंर्गत नाशिकच्या साठवलेल्या उन्हाळ कांद्याच्या वाढलेल्या मागणीस कारणीभूत असल्याचे निर्यातदार विकास सिंह यांचे निरीक्षण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com