विकास गिते : सिन्नर- तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात यावर्षी, मधमाश्यांची स्पष्ट अनुपस्थिती कांदा बियाणे उत्पादकांना आणि कंपन्यांसाठी चिंतेचे कारण बनले आहे. कांदा बियाणे उत्पादकांना यावर्षी मधमाशी दिसेनाशी झाल्याने परागीकरण होत नसल्याने कांदा उत्पादक बियाणे शेतकरी चिंतेत असल्याचे देवपूर येथील कांदा उत्पादक तसेच बियाणे उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर शांताराम गडाख व गोवर्धन रानडे यांनी सांगितले.