Agricultural News : दुबईची बंदरे कुलूपबंद; मागणी असूनही नाशिकचा कांदा-द्राक्षे पडून!

Rising Demand for Indian Onion and Grapes in Gulf : आखाती देशांतील युद्धामुळे दुबईतील बंदरे आणि विमानतळ बंद झाल्याने नाशिकहून होणारी कांदा व द्राक्षांची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.
Grape and Onion

Grape and Onion

sakal

Updated on

नाशिक: मुस्लिम धर्मीयांचा रमजान महिना सुरू असतानाच इराण व इस्राईल यांच्यात युद्ध सुरू झाल्याने आखाती देशांतून भारतीय कांदा व द्राक्षाला मागणी वाढली आहे. त्याचे दर अचानकपणे वाढल्याने ही मागणी होत असली तरी दुबईतील आयात-निर्यातीचे बंदर बंद झाल्याने या मागणीचा भारतीय निर्यातदार किंवा उत्पादकांना काहीच फायदा घेता येणार नसल्याचे नाशिकच्या निर्यातदारांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com