लासलगाव- काही दिवसांपासून कांद्याच्या भावात कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. चांगल्या पावसामुळे उत्पादनात वाढ झाली असली, तरी परदेशी मागणीत मात्र घट आणि बांगलादेशकडून आयातीवर शुल्क लावण्यात आल्याने शेतकऱ्यांना कांदा कवडीमोलाने विकावा लागत आहे.