लासलगाव, (जि. नाशिक): देशातील प्रमुख कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील रतलाम, इंदूर, उज्जैन परिसरात अजूनही सुमारे ६० टक्के कांदा साठवलेला आहे.