लासलगाव- ‘कांदा भाव कधी वाढतील?’ हा प्रश्न सध्या शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्यांची फारशी मोठी अपेक्षा नाही, फक्त दोन हजार ते दोन हजार ५०० रुपये क्विंटल एवढा भाव मिळावा, हीच माफक अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.