Nashik Onion Price: मुंगसे बाजारात लाल कांद्याची आवक वाढली; क्विटंलला अधिकचा भाव

Onion
Onionesakal

Nashik Onion Price : तालुक्यासह कसमादे परिसरात आठवड्यापासून लाल कांद्याची आवक वाढली आहे. मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात मंगळवारी (ता. ५) ७० टक्के लाल कांदा विक्रीसाठी आला होता. दिवसभरात १ हजार १५ वाहनांतून १५ हजारावर क्विंटल कांद्याची आवक झाली.

त्यात उन्हाळी ४ हजार, तर लाल कांदा ११ हजार क्विंटल होता. मजूर उपलब्ध होऊ लागल्याने व बाजारभाव चांगला असल्याने नवीन लाल कांद्याची पहिल्यांदा आवक वाढली आहे. बाजारात उन्हाळी कांद्याला ४ हजार ६० आणि लाल कांद्याला ४ हजार २९० रुपये क्विंटल असा अधिकचा भाव होता. (onion Price up to 4 thousand 290 rupees per quintal in mungse bazar nashik news )

दिवाळी सुटीनंतर बाजारात कांद्याची आवक वाढू लागली आहे. सलग दोन आठवडे दोन्ही सत्रात दररोज हजाराच्या आसपास वाहनातील कांद्याचा लिलाव झाला. प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी चाळींमध्ये उन्हाळी कांदा राखून ठेवला होता. दोन महिन्यापासून कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली.

दिवाळीपूर्वी उन्हाळी कांद्याची आवक मोठी होती. दिवाळीनंतर लाल कांदा बाजारात येत आहे. राखून ठेवलेला उन्हाळी कांदा कमी प्रमाणात शिल्लक आहे. काही शेतकऱ्यांनी अजून चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने कांदा चाळींमध्ये राखून ठेवला आहे.

बाजारात उन्हाळी कांद्याची आवक कमी होत आहे. मुंगसे बाजारात २९५ वाहनांतून उन्हाळी आणि ७१० वाहनातून लाल कांदा विक्रीसाठी आला होता. उन्हाळी कांद्याला किमान १ हजार ५०, सरासरी ३ हजार ४५० रुपये क्विंटल असा भाव होता.

Onion
Nashik Onion News: मुंगसे बाजारात 4 दिवसात कांद्याची 25 कोटींची उलाढाल! 85 हजार क्विटंलची विक्री

लाल कांद्याला किमान ७५०, सरासरी ३ हजार ३७५ रुपये क्विंटल असा भाव राहिला. चांगला भाव असल्याने लाल कांदा काढणीची लगीनघाई मळ्यांमध्ये सुरू आहे.

यावर्षी अपुऱ्या पावसामुळे मका, बाजरीचे पीक अर्धवट सोडून शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. उपलब्ध पाण्याच्या भरवशावर उन्हाळी कांद्याची लागवड जोमात सुरू आहे. खरिपातील कांदा सध्या बाजारात येत आहे. लेट खरिपातील कांदा लवकर बाजारात येईल. किमान चार महिने भाव टिकून राहिल्यास यावर्षी कांदा शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकेल.

रोजगारनिर्मितीला चालना

तालुक्यासह कसमादेत गेल्या दोन महिन्यापासून कांदा ‘भाव' खात आहे. उन्हाळी व नवीन लाल अशा दोन्ही प्रकारचा कांदा कसमादेतील विविध बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी येत आहे. कांद्याची आवक वाढल्याने ट्रॅक्टर, पीक-अप, टेम्पो आदी वाहनांना मोठा रोजगार मिळत आहे. कांद्याने शेतकऱ्यांबरेाबर खासगी वाहनचालकांना दिलासा दिला आहे. सध्या होत असलेली कांदा लागवड पाहता, आगामी काही महिने तरी वाहनचालकांना चांगला व्यवसाय मिळू शकेल.

Onion
Onion Prices Hike : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कांद्याचा दर वधारला; जुना कांदा 5,500 तर नवीन 4,500 रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com