नाशिक रोड- केंद्र सरकारने वीस टक्के निर्यात मूल्य कमी केल्याने दरवाढ होईल, अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होती. परंतु त्यानंतरही कांद्याचे दर घसरत असल्याने पर्यायाने शेतकऱ्यांनी मात्र कांदा चाळीत साठवणुकीवर भर दिला आहे. तसेच कांदा मातीमोल भावाने विकण्यापेक्षा बाजारभाव वाढ होईपर्यंत शेतकऱ्यांनी तोपर्यंत कांदा चाळीत साठवणुकीला पसंती दिली आहे.