कांदाभावात किलोला 50 पैसे ते रुपयाने घसरण | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Onion latest marathi news

कांदाभावात किलोला 50 पैसे ते रुपयाने घसरण

नाशिक : ‘नाफेड’तर्फे उद्दिष्टाइतका कांदा (Onion) खरेदी झाल्याने खरेदी बंद करण्याचा निर्णय झाला. यासह उत्तर भारतात सोमवार (ता. १८)पासून श्रावणाची सुरवात झाली असून, सततच्या पावसामुळे ट्रकच्या उपलब्धतेवर २० ते ३० टक्के परिणाम झाला आहे.

त्यामुळे कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या खरेदी भावात किलोला ५० पैसे ते एक रुपयाने घसरण (Onion Price stepped down) झाली. येवल्यात उन्हाळ कांद्याची सरासरी ९५०, तर पिंपळगावमध्ये एक हजार ३५०, लासलगावमध्ये एक हजार १५०, कळवणमध्ये एक हजार २५१, मनमाडमध्ये एक हजार ५० आणि देवळ्यात एक हजार २५० रुपये क्विंटल भावाने कांद्याची विक्री झाली. (Onion prices fall by 50 paise to 1 Rs nashik latest marathi news)

दक्षिण भारतात पावसामुळे कांद्याचे नुकसान होते. हा दोन वर्षांतील अनुभव जमेस असल्याने तेथील शेतकऱ्यांनी कांदालागवड उशिरा करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे दक्षिणेतील कांदा उत्पादनावर ४० ते ५० टक्क्यांनी परिणाम झाल्याची माहिती कांद्याच्या आगरात पोचली आहे.

त्यामुळे स्वाभाविकपणे निर्यातदार आणि देशांतर्गत व्यापाऱ्यांचा कांद्याच्या आगरातील कांदा खरेदीवर सप्टेंबरपर्यंत भर राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ‘नाफेड’ने कांदा खरेदी बंदचा निर्णय घेतल्याने ‘मार्केट इम्पॅक्ट’ला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले.

व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पावसामुळे ‘सप्लाय चेन’ काहीशी बाधित झाली आहे. शिवाय उत्तर भारतातील श्रावणामुळे तेथील मागणीत सोमवारी २० टक्क्यांनी घट झाल्याचे व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आले.

बांगलादेशची सीमा खुली

बांगलादेशाने कांद्याच्या आयातीसाठी यापूर्वी सीमा खुली केली होती. मध्यंतरी बकरी ईदच्या सुटीमुळे आठवडाभर बांगलादेशात कांद्याची निर्यात झाली नव्हती. मात्र, काही दिवसांपासून पुन्हा बांगलादेशमधील व्यापाऱ्यांकडून कांद्याची मागणी सुरू झाली आहे.

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पाऊस आणि श्रावणामुळे झालेला परिणाम, काहीअंशी बांगलादेशमधील पुरवठ्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मागणी कायम राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Nashik : बीट मार्शलमुळे मोठा अनर्थ टळला

अवजड वाहतुकीस प्रतिबंध

कांद्याच्या निर्यातीला ठाणे जिल्ह्यातील अवजड वाहनांच्या प्रतिबंधामुळे दुष्काळात तेरावा महिना या उक्तिगत अवस्था झाल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. जवाहरलाल नेहरू बंदरातून कंटेनर वाहतूक व इतर अवजड वाहने नवी मुंबई हद्दीतून ठाणे जिल्ह्यात प्रवेश करत गुजरात व नाशिकच्या दिशेने जातात.

त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील हद्दीत मोठ्या प्रमाणात दैनंदिन वाहतूक कोंडीची समस्या तयार होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतर १४ जुलैपासून अवजड वाहने सकाळी सहा ते दुपारी बारा आणि दुपारी चार ते रात्री अकरापर्यंत रस्त्यावर येणार नाहीत, असा निर्णय नवी मुंबई वाहतूक शाखेने घेतला आहे.

अवजड वाहनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न तयार झाल्यास जबाबदार धरण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे बंदराकडे कंटेनर जाण्यासाठी दुपारी बारा ते चार आणि रात्री अकरा ते सकाळी सहापर्यंतची वेळ राहणार आहे. नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी हा प्रतिबंध जाचक ठरणार असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: रामसेतूचे नाट्य दिवसेंदिवस रंगतदार; वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा फलक गायब

Web Title: Onion Prices Fall By 50 Paise To 1 Rs Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top