10291
पिंपळगाव बसवंत : उन्हाळ कांद्याचे सुरू असलेले लिलाव.
पिंपळगावला उन्हाळ कांद्याला
साडेपाच हजार रुपयांचा दर
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता. ३१ : बाजार समितीत उन्हाळ कांद्याला पाच हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल असा आकर्षक दर मिळतो आहे. आठ दिवसात पाचशे रुपये प्रतिक्विंटलने दर वधारले आहेत. दुष्काळी स्थितीत कांद्याचे दर साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलकडे झेपावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पिंपळगाव बाजार समितीत कसमादेसह नाशिक जिल्ह्यातून दररोज नऊ हजार क्विंटलची आवक होत आहे. सध्या मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने दरात तेजी आली आहे. सरासरी चार हजार २५० रुपये तर कमाल पाच हजार सहाशे रुपये असा दर उन्हाळ कांद्याला मिळतो आहे.
लाल कांद्याचेही पिंपळगाव बाजार समितीत आगमन झाले आहे. उन्हाळच्या बरोबरीने लाल कांदा भाव खातो आहे. लाल कांद्याला कमाल पाच हजार ४७० तर सरासरी चार हजार ८०० रुपये दर मिळतो आहे.
------
पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला उच्चांकी साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतो आहे. अद्ययावत सुविधामुळे उत्तर महाराष्ट्रातून कांदा लिलावासाठी येत आहे. शेतकऱ्यांना लिलाव अथवा रोख पेमेंटसाठी कोणतीही अडचण येऊन नये म्हणून चोख नियोजन करण्यात आले आहे.
- आमदार दिलीप बनकर, सभापती, बाजार समिती, पिंपळगाव बसवंत
--------