नामपूर- उन्हाळ कांद्याचे दर काही महिन्यांपासून स्थिर असून, मेमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा व्हावी, यासाठी ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते.