Onion Crisis
sakal
किरण कवडे- जिल्ह्यात कांदा उत्पादन वाढले तरी भावातील घसरण आणि हवामानातील अनिश्चितता शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. उत्पादन क्षेत्र अडीच लाख हेक्टरपर्यंत वाढले पण भाव १३०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल असल्याने शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दर वर्षी येणारे हे दुष्टचक्र संपण्याचे चिन्ह नसल्याने शेतकरी हवालदिल आहे.