खामखेडा- कसमादे भागात यावर्षी कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे. बंपर उत्पादनाची आशा असताना अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलामुळे कांद्याला फटका बसणार आहे. वीस टक्के उत्पादन शुल्क कमी केल्याने भाव वाढ होईल अशी अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी सध्या कांदा साठवणुकीवर भर दिला आहे.