हिशोबपत्रके ऑनलाईन पद्धतीने दाखल करणे

हिशोबपत्रके ऑनलाईन पद्धतीने दाखल करणे
Published on: 
ॲंकर ऑनलाइन हिशोबपत्रकानंतर पावतीची सक्ती बंद (उपशीर्षक) धर्मादाय न्यासांना दिलासा; पोहोचपावती कार्यालयात जमा करण्याची गरज नाही सकाळ वृत्‍तसेवा जळगाव, ता. ६ : महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० मधील कलम ३४ अन्वये धर्मादाय न्यासांना हिशोबपत्रके ऑनलाइन दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ऑनलाइन हिशोबपत्रक दाखल केल्यानंतर त्याची पोहोचपावती संबंधित जिल्हा धर्मादाय कार्यालयात प्रत्यक्ष जमा करण्याची सुरू असलेली प्रथा आता बंद करण्यात आली आहे. आता प्रत्यक्ष पावती जमा करण्याची सक्ती बंद करण्यात आल्‍याने विश्वस्तांना होणारा त्रास कमी होणार आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने याबाबत स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत. ऑनलाइन हिशोबपत्रक दाखल केल्यानंतर त्याची पोहोचपावती संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष जमा करण्याची आवश्यकता नाही. ऑनलाइन दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याच कागदपत्राची प्रत कार्यालयात आणून देण्याची गरज नसल्याने न्यासांच्या पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रत्यक्ष पावतीची सूचना नव्हती ऑनलाइन हिशोबपत्रके दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर संबंधित न्यासांना यूजर-आयडी देखील देण्यात आले आहेत. हिशोबपत्रक ऑनलाइन दाखल केल्यानंतर त्याची पोहोचपावती प्रत्यक्ष कार्यालयात जमा करण्याबाबत संदर्भित परिपत्रकात किंवा अन्य कोणत्याही परिपत्रकात सूचना देण्यात आलेल्या नसतानाही ही प्रथा सुरू होती. मात्र आता या पद्धतीला विराम देण्यात आला आहे. चौकट अधिकाऱ्यांना सक्ती न करण्याच्या सूचना ऑनलाइन हिशोबपत्रक दाखल केल्यानंतर त्याची फिजिकल पोहोचपावती सादर करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी कोणत्याही विश्वस्ताकडे मागणी अथवा सक्ती करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. याची सर्व संबंधितांनी नोंद घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोहोचपावती जमा करण्याची आवश्यकता नसल्याने न्यासांच्या कामकाजातील अनावश्यक कागदपत्रे आणि कार्यालयीन फेऱ्या कमी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com